संस्थेशी व्यवहार करताना तुम्ही कशाला प्राधान्य देता ?

" निश्चितच ठेवीच्या सुरक्षिततेला. "

आणि गेली अनेक वर्ष आम्ही हेच करत आलो आहोत ...

    समृध्द जीवनासाठी सहकार, सचोटी आणि समृद्धी या त्रिसुत्रीने प्रेरीत होऊन तसेच आर्थिक व्यवहारातुन विधायक कार्याद्वारे रचनात्मक विकास साधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच आपल्या श्री मंगलनाथ मल्टीस्टेट .. ने आपल्या कार्यास प्रारंभ केला.
    सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असतांना केवळ आर्थिक व्यवहारा पुरतेच सिमीत राहु नये. तर सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात व सामाजिक उत्तरदायीत्वाची भावना आपल्या विचारातुन आणि कृतीतून जोपासली जावी ही संस्थेची विचारप्रणाली आहे.
    श्री मंगलनाथ मल्टीस्टेट .. ही बीड जिल्हातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. ५ शाखा व १०० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ग्राहकांच्या हितासाठी कमी व्याजदरात कर्ज व ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्याचे काम संस्था करत आली आहे.
    प्रामाणिकपणा, कौशल्य, विश्वास व ग्राहकसेवा हा आमचा प्रगतीचा मंत्र आहे. या बळावरच आम्ही यशस्वी प्रगती केली. याचा आम्हाला अभिमान वाटतो. स्वाध्यायी वृत्तीने चालु या सहकार चळवळीस आपल्या सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. या पुढे ही सहकार्य मिळेल ही अपेक्षा ...!

 संस्थेला मिळालेले पुरस्कार
 
 • नॅशनल फेडरेशन बेस्ट सी.ई.ओ. पुरस्कार
 • सहकार भूषण पुरस्कार
 • सहकार रत्न पुरस्कार
 • दीप स्तंभ पुरस्कार
 • बँको पुरस्कार २०१५ ते २०२०
 •  
   संस्थेचे आगामी लक्ष
   
 • संस्थेचा व्यवसाय १००० कोटीपर्यंत वाढवणे
 • महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात शंभराहून अधिक शाखा वाढवणे
 • १००० तरुणांना प्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध करून देणे
 • मंगलनाथ बचत बाजार च्या माध्यमातून किराणा सामान व इतर गृहपयोगी वस्तू योग्य दरात उपलब्ध करून देणे
 • मंगलनाथ ॲग्रो मल्टीस्टेट च्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे खते व औषधे योग्य भावात देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे
 •